मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अनिल देशमुख (Anil Deshmukh), छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यासारखे मंत्री तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यापासून त्यांच्या पक्षाच्या लोकांनी हात काढून घेतला. ही तुमची संस्कृती आहे.

आमच्या पक्षाच्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे ही आमची संस्कृती आहे.

Advertisement

म्हणून आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या मागे मी आणि पक्ष खंबीरपणे उभे आहे, असे प्रत्युत्तर पाटलांनी राऊतांना दिले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, सर्व प्रकरणे गळ्याशी आल्यानंतरच शिवसेनेला सारे कसे आठवते? २७ महिन्याची सत्ता असताना तुम्ही कारवाई का केली नाही? अमोल काळे यांच्यावर कोट्यवधीचे आरोप करण्यापेक्षा तुमचे सरकार आहे.

रीतसर गुन्हा दाखल करा. त्यांना फरार जाहीर करून कारवाई सुरू करा. हम करे सो कायदा प्रमाणे मनमानी चालणार नाही.

Advertisement

उद्या काळे, सोमय्या, कंबोज हेसुद्धा अब्रुनुकसानीचे दावे दाखल करतील. त्याच्या सुनावणीला उपस्थित राहता राहता तुम्ही मरून जाल.

किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याबाबत वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, अशा अनेक बैठका यावर यापूर्वी झाल्या आहेत.

मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. किरीट सोमय्या अशा धमक्यांना घाबरत नाहीत. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत.

Advertisement

भडकाऊ शब्द वापरले जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भडवा हा शब्द महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात कधीपासून आला?

त्या ऐवजी एजंटगिरी सारखे शब्द वापरता येणे शक्य आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची गरज असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Advertisement