रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या बँकांवर आर्थिक निर्बंध लादले जातात. ठेवीदारांना ठरावीक रक्कम मिळते; परंतु कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असलेल्या पतसंस्थांना मात्र काहीच मिळत नाही. त्यामुळं पतसंस्था अडचणीत येतात. 0

एक हजार कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या

आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या राज्यातील बॅंकांमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे सध्या शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, त्यांच्या ठेवीदारांनाही स्वतः:चे पैसे परत मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.

पतसंस्थांमध्ये बहुतांश नोकरदार, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक, फेरीवाले, हमाल यांच्यासह सामान्य ठेवीदार पैसे ठेवतात. काही पतसंस्था चालकांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले. त्यामुळे काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. यासोबतच गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या काही बॅंकांमुळे पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे पतसंस्थांमधील सामान्य ठेवीदारही अडचणीत आले आहेत.

Advertisement

कोयटे यांची भेटही निरुपयोगी

राज्य पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे आणि पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन सहकारमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या वेळी बॅंकांमध्ये शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा झाल्यानंतर पतसंस्थांना ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु पतसंस्थांना अद्याप ठेवी परत मिळालेल्या नाहीत.

प्रशासक, अवसायकात पतसंस्थांचे प्रतिनिधी हवेत

निर्बंध लादण्यात आलेल्या बॅंकांवर सहकार खात्याचे अधिकारी प्रशासक किंवा अवसायक म्हणून पूर्णवेळ देऊ शकत नाहीत.

लोकसेवा सहकारी बॅंकेत पतसंस्थांचे पैसे अडकले होते; परंतु पदाधिकाऱ्यांवर विश्वास आणि प्रशासकीय मंडळावर नेमण्यात आलेल्या बॅंक आणि पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांमुळे ठेवीदारांना ८५ टक्के ठेवी परत मिळणे शक्य झाले. त्यामुळे सहकारी बॅंकांवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकीय किंवा अवसायक मंडळात ठेवीदार आणि पतसंस्थांचे प्रतिनिधी असावेत.

Advertisement