शेजारी राहणाऱ्या मुलीला दगड मारत जखमी केल्याप्रकरणी गोजूबावी (ता. बारामती) येथील पती-पत्नीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अश्विनी नीलेश बगाडे या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार सुवर्णा शंकर साळवी व शंकर साळवी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. ९) रोजी सकाळी सात वाजता गोजूबावीत ही घटना घडली. फिर्यादी व संशयित हे शेजारी राहतात. फिर्यादी नळावर पाणी भरत असताना सुवर्णा यांनी शिवीगाळ केली.

Advertisement

त्याचा जाब फिर्यादीने विचारला शंकर साळवी याने तेथे येत माझ्या पत्नीशी का भांडते अशी विचारणा करत दगड फेकून मारला.

तो फिर्यादीची मुलगी वैष्णवी हिच्या पायावर लागून ती जखमी झाली. या दोघांनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement