Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भोंदूबाबाच्या नादी लागून पतीची हत्या

प्रेम आंधळ असतं. प्रेमात आंधळं झालं, की हातातू काहीही घडू शकतं. प्रेमानं आंधळं झालेल्या व्यक्ती ज्याच्या प्रेमात पडलो, त्याच्या नादी लागून कोणतंही कृत्य करतात.

पुण्यात असाच प्रकार घडला असून, त्यात आता पतीच्या खुनात सहभागी झालेल्या पत्नीलाही आता बेड्या पडल्या आहेत.

भोंदूबाबाच्या प्रेमात फसली आणि गुन्ह्यात अडकली

भोंदूबाबांच्या नादी लागलं तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण पुण्यात समोर आलं. एक महिला या भोंदूबाबाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करायलाही तिनं मागं-पुढं पाहिलं नाही. आज ही महिला भोंदूबाबासह तुरुंगाची हवा खात आहे.

असं पडलं पितळ उघडं

रमेश कुंभार असं या भोंदू बाबाचं नाव असून त्यानं पिंपरी-चिंचवडमधील आनंद गुजर यांचा खून केला. पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ आनंद गुजर यांचा मृतदेह आढळला आणि या भोंदूबाबाचं पितळ उघडं झालं.

अनैतिक संबंध आणि मालमत्ता प्रकरणात अडसर ठरत असल्यानं त्यानं हे कृत्य केलं. आनंद गुजर यांची पत्नीदेखील या कटात सामील होती.

बुवाबाजीच्या आहारी जाऊन कृत्य

पिंपरी-चिंचवडच्या एका मठात आनंद गुजर यांची हत्या झाली. हा शिवगोरक्षनाथ मठ गेल्या तेरा वर्षांपासून रमेश कुंभार चालवतो. बुवाबाजीसाठी तो या ठिकाणी प्रचलित आहे.

रमेश कुंभारच्या संपर्कात आनंद गुजरच्या पत्नी सरोज गुजर आल्या. भेटी-गाठी वाढू लागल्या. गेल्या दोन महिन्यांपासून तर सरोज गुजर त्यांच्या दोन्ही मुलांसह इथंच वात्सव्यास होत्या.

यातूनच त्यांचे किती घनिष्ट संबंध होते हे स्पष्ट होतं. तीन जुलैला आनंद गुजर इथं आले होते. तेव्हा इथं वाद झाला. त्यांना लाकडी बॅट आणि दांडक्यानं बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आला.

अनेकांना गंडा घातल्याचा संशय

कात्रज बोगद्याजवळ तीन जुलैला अनोळखी मृतदेह आढळला. पुणे पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आणि हत्येचं कनेक्शन या मठापर्यंत पोहचलं. आनंद गुजरच्या पत्नी सरोज गुजर आणि भोंदूबाबा रमेश कुंभारसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या.

वाल्हेकरवाडीत शिवगोरक्षनाथ हा मठ तेरा वर्षांपासून सुरू आहे. छोटी दर्गा, मंदिर त्यात विविध मूर्त्यांची स्थापना, होमहवन आणि त्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वस्तू. यातून रमेश कुंभार या भोंदूने अनेकांना गंडा घातला असण्याची दाट शक्यता आहे.

Leave a comment