मोबाइल आणि छुप्या कॅमेऱ्याच्या सध्याच्या जमान्यात लपून असे काहीच राहत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे असते.

महिलांचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करणे, ते व्हिडीओ व्हायरल करणे आणि त्याआधारे खंडणी उकळण्याचे प्रकार सुरु आहेत. ग्रॅण्टरोड येथे तर पतीनेच पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काय घडले?

गोरेगाव येथे राहणारी एक फॅशन डिझायनर विवाहासाठी सुयोग्य तरुणाच्या शोधात होती. एका वधू-वरसुचक मंडळात तिने आपले नाव नोंदविले. या मंडळातून तिला ग्रॅण्ट रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे स्थळ दाखविण्यात आले.

Advertisement

चांगला व्यवसाय, चांगले कुटुंब असल्याने फॅशन डिझायनर तरुणीने लग्नासाठी होकार दिला. लग्नानंतर उत्तेजनावर्धक गोळ्या घेऊन पती शरीरसंबंध ठेवत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने यासाठी विरोध केला. यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले.

पत्नी ऐकत नसल्याने रागावलेल्या पतीने खोलीमध्ये छुपे कॅमेरे बसविले. यामध्ये पत्नीचे घरातील अश्लिल चित्रीकरण करण्यात आले व ते मित्रांना पाहण्यासाठी पाठवण्यात आले, असा आरोप पत्नीने केला आहे.

या प्रकारामुळे धक्का बसलेल्या पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यवसायिकाला अटक केली असून, सध्या तो जामिनावर आहे.

Advertisement

महिलांचे अनेक ठिकाणी छप्या कॅमे-याद्वारे चित्रण

मुंबईत असेच प्रकार अनेक ठिकाणी घडत असून यासंदर्भात तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कुणी बदला घेण्यासाठी, कुणी पैसे उकळण्यासाठी तर कुणी अन्य कारणांसाठी असा गंभीर प्रकार करीत आहेत.

मोबाइलची सहज उपलब्धता, इंटरनेटचा वाढता गैरवापर ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

गैरप्रकार वाढू लागले…

पोलिसांकडे आलेल्या तक्रारींनुसार मुंबईत कॅमेऱ्याच्या गैरप्रकाराच्या घटना वाढत आहेत. समाधानाची बाब म्हणजे हा अन्याय मुकाट सहन करण्यापेक्षा महिला याविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. कुणी बदला घेण्यासाठी, कुणी पैसे उकळण्यासाठी तर कुणी अन्य कारणांसाठी असे गंभीर गुन्हे करीत आहेत.

Advertisement