विवाहितेचा छळ करून तिच्या कुटुंबीयांकडून २१ लाख रुपये उकळल्याच्या आरोपावरून तिच्या पती आणि सासूविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जितीन अमृतलाल मसंद (३८) आणि गीता अमृतलाल मसंद (७०, मुंबई) ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विधी जितीन मसंद (३३, रा.मुंबई) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी विधी यांना निरनिराळ्या कारणांनी शिवीगाळ व मारहाण करीत असत. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांनी आतापर्यंत २१ लाख रुपये उकळले. यासंदर्भात त्यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पुणे : किरकोळ कारणावरून येरवडा येथील मदर तेरेसानगर युवकावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपावरून चार जणांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १०) गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

करण कुंभार, गणेश जगताप, अदित्य होळकर, शुभम बेंगळे ही संशयित आरोपीची नावे आहेत. या संदर्भात यश भोलेनाथ अरगडे (१६, रा. मदर तेरेसानगर, येरवडा) याने फिर्याद नोंदवली आहे.

यश त्याच्या घरासमोर उभा असताना वरील चौघांनी त्याच्यावर पालघन, कोयता, लाकडी बांबूने हल्ला चढवला. त्यांच्याविरुद्ध दरम्यान, दहशत पसरविल्या प्रकरणी, कोरोना कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement