सोलापूर : जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील भुरीकवठे (Bhurikavathe) गावात पतीच्या मृत्यूनंतर ९० मिनिटांत पत्नीचाही मृत्यू (Husband Wife Death) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे खुने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पतीच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात पत्नीचा मृत्यू झाला आहे. लग्नात फेरे घेतल्यानंतर ७ जन्मी साथ देण्याचे वचन देण्यात येते त्याचाच प्रत्यय खुने कुटुंबियांना आला आहे.

६५ वर्षाच्या सुखी संसारानंतर या दाम्पत्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या दोघांनी शेवट्पर्यंत एकमेकांना साथ दिल्याचे अनुभवायला मिळाले आहे. आजी आणि आजोबा एकाच दिवशी मरण पावल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर ओढावला आहे.

Advertisement

बाबुराव खुने (Baburav Khune) (वय ९०) आणि चतुराबाई बाबुराव खुने (Chaturabai Khune) (वय ८०) असे मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. ९० वर्षाच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर ८० वर्षीय पत्नीने देखील अवघ्या ९० मिनिटांमध्ये डोळे मिटवून घेतले आहेत.

बाबुराव खुने यांचा आजारपणामुळे मृत्यू (Death)झाला. हाच धक्का त्यांच्या पत्नी चतुराबाई खुने यांना सहन न झाल्यामुळे दीड तासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. शेवटपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिल्याचे दिसून आले आहे.

Advertisement