file photo

मुंबई : भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान (Uttar Pradesh Assembly elections) एक अजब घोषणा केली आहे. त्यांनी लवकरच हवेत बस उडवू अशी घोषणा केली आहे.

नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीमुळे भाजपच्या (BJP) प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचे सांगितले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, माझ्याकडे आता रोपवे, केबल कार आली आहे. आता मी केशवजींना सांगितलं आहे की, हवेत चालणाऱ्या बसचाही डीपीआर तयार करत आहोत.

Advertisement

प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू. तुम्ही रस्ता तयार करुन घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही.

मी करोडोंमध्येच चर्चा करतो. यावेळी त्यांनी यासंबंधीच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना माहिती देण्यात आली असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

प्रयागराजमध्ये (Prayagraj) सी प्लेन सेवा सुरु करण्याचे आपले स्वप्न आहे, ज्यामुळे मी दिल्लीवरुन उड्डाण करुन संगमच्या पाण्यातून प्रयागराजमध्ये लँण्डिंग करुन शकतो. लवकरच हेदेखील सत्यात उतरणार आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

Advertisement

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात मुबलक ऊस उपलब्ध होता, त्याच्या सहाय्याने इथेनॉलचा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाईल.

इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन १०० रुपये लीटर पेट्रोलच्या तुलनेत ६८ वर येईल असा दावा गडकरींनी केला.

Advertisement