पणजी : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) हे गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election)  प्रचारासाठी गेले आहेत.

महाराष्ट्राचे (maharashtra) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला.

आमच्या नव्हे तर एनडीएतील (NDA) मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे. त्यामुळेच एक एक करून सर्व पक्ष भाजपला सोडून गेले.

Advertisement

तसेच आम्ही कोणत्याही घोडेबाजारावर विश्वास ठेवत नाही. शिवसेनेचे वाघ असतात. वाघांचा बाजार नसतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये (Press conference) पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आलो नाही.

तर आम्ही केवळ गोव्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलो आहोत असे स्पष्टीकरणही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Advertisement

मागच्या काळात भाजपसोबत युती होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भावना होती. मित्राला धोका होऊ नये.

हिंदू मतात फूट पडू नये आणि आपल्यामुळे मित्राला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो. त्या काळात इतर पक्ष वाढत गेले. आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले.

खासदार आणि मंत्री झाले. तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नव्हतो. पण, गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमच्याच नाही जे काही एनडीएचे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले.

Advertisement

त्यामुळे ज्या ठिकाणी आमचे अस्तित्व होते तिथे आम्ही लढायला सुरुवात केली आहे, असेही आदित्य ठाकरे पत्रकार परिषद मध्ये म्हणाले आहेत.