Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महापाैरांना मी स्वतःच दिले होते निमंत्रणः अजित पवार

“मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं; मात्र बातम्या वेगळ्या आल्या. आज त्यासंदर्भात माझी महापौर आणि माझी चर्चा झाली. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झाले.

यापुढे असं होणार नाही, असा आदेश प्रशासनाला दिला आहे. मी पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही,” असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.

गैरसमज होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश

पवार यांनी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी नुकताच झालेला महापौरांच्या निमंत्रणावरील वादावरही भाष्य केलं. “पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो.

मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही,” असं आश्वासन पवार यांनी यावर दिलं. तसेच मुंबईतील बैठकीचं निमंत्रण मी स्वतः महापौरांना दिलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

पाचशे रुग्णवाहिका घेणार

“एखादी बैठक टाळली तर लगेच वेगळी चर्चा होते” पवार म्हणाले, “मागच्या बैठकीला ऑफिसच्या कामामुळे मला येता आलं नाही. दुर्दैव असं की एखादी बैठक टाळली, तर लगेच चर्चा वेगळी होते.

आंबिल ओढ्याच्या तोडकामासंदर्भात जी चर्चा झाली, त्याबाबत माझा काही संबध नाही. यामध्ये बऱ्याचदा राजकारण आणलं जातंय.”

 

Leave a comment