राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबद्दल मिश्कील शैलीत भाष्य केलं. मी पूर्वी असे उद्योग ब-याचदा केले. आताची बैठक मात्र शेतक-यांसंदर्भात होती, असे त्यांनी स्पष्ट केलं.

तिस-या आघाडीची चर्चाच नाही

बैठक तिस-या आघाडीसाठी वगैरे नव्हती. असले मुद्दे त्या बैठकीत चर्चेला नव्हते. आघाडीची ही चर्चा नव्हती.

भाजपच्या विरोधातील आघाडी ही काँग्रेसला घेऊनच आघाडी होऊ शकते; मात्र आताची चर्चा तिस-या आघाडीबद्दलची नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतक-यांच्या संघर्षाबाबत चर्चा

Advertisement

प्रशांत किशोरांसंदर्भातील बैठकीबाबत ते म्हणाले की, तिस-या आघाडीसंदर्भातील गैरसमज माध्यमातूनच पसरले आहेत. दिल्लीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून शेतक-यांचा संघर्ष सुरू आहे. ते रस्त्यावर बसलेले आहेत.

यासंबंधी ते जे संघटन आहे, ते राजकीय पक्षांना बाजूला ठेवून आपले प्रश्न मांडतात; पण आम्हाला असं वाटलं काही जणांना की एक महत्त्वाचा प्रश्न देशात मांडला जातोय, तर त्याचं समर्थन कसं करता येईल आणि केंद्र सरकारला कशा प्रकारे सूचना करता येईल, याचा विचार करायला आपण एकत्र बसलं पाहिजे असा विचार करुन काही संघटना आणि राजकीय पक्ष एकत्रपणे चर्चा केली पाहिजे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चर्चा केली पाहिजे, यासाठी ही बैठक होती.

काश्मीरसंबंधीच्या बैठकीचं स्वागत

काश्मीर प्रश्नावर झालेल्या बैठकीचं शरद पवार यांनी स्वागत केलं. नेहरु पंतप्रधान असताना त्या वेळी जो निर्णय झाला तो अनेक वर्षे राबवला गेला. जो विशेष दर्जा दिला गेला होता, तो आजच्या राज्यकर्त्यांनी काढून घेतला.

Advertisement

याचे परिणाम वाईट होतील असं आम्ही सांगितलं होतं; पण तरीही निर्णय आडमुठेपणाने घेतला. दीड दोन वर्षांनी त्यांना उपरती होत असेल आणि हा निर्णय बदलून पुन्हा विशेष दर्जा देण्याची उपरती होत असेल तर त्याचं स्वागत आहे, असं ते म्हणाले.