मुंबई : अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) नुकताच रितेश (Ritesh) सोबत ब्रेकअप (Breakup) केला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s day) आदल्या दिवशी एक इन्स्टाग्राम (Instagram) पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये राखी सावंतने पती रितेशपासून वेगळे होत असल्याचे सांगितले आहे. यामध्ये ती म्हणाली की, “मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले. आम्ही एकत्र एका घरात राहिलो. पण एकेदिवशी रितेश अचानक बॅग भरून निघून गेला.

त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने तो काही कायदेशीर अडचणीत आला आहे, आणि आता त्याला माझ्यासोबत राहायचे नाही, असे सांगत तो निघून गेला.” असे ती म्हणाली आहे.

Advertisement

तसेच पुढे, “मला कल्पना आहे की उद्या व्हॅलेंटाईन डे आहे, मात्र त्याआधी मी एक निराशाजनक बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी आणि रितेशने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

मी त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्याला निरोगी आयुष्य लाभो. मला इतके दिवस समजून घेतल्याबद्दल धन्यवाद”, असे राखीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram post) म्हटले आहे.

राखी सावंत ही नेहमी वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. तिची विधाने, तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. राखीच्या लव्ह अफेअर्सवर उघडपणे चर्चा होत असतात.

Advertisement