पुणे : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या (Maharashtra State Teacher Development Institute) उद्घाटन सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिक्षकांना बदलत्या काळाविषयी संबोधित केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांना मी खूप जवळून पाहतो. ते आजही तरुण पिढीसोबत (younger generation) चालण्याचे प्रयत्न करतात. शरद पवारांसारखे अपडेट राहायला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

काळ बदलला आहे. विद्यार्थी बदलले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी (Teacher) बदलले पाहिजे. आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झाले आहेत. इंटरनेटमुळे जगाशी जोडले गेले आहेत.

Advertisement

इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते यासंदर्भात आजचे विद्यार्थी जागृत आहेत. शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, त्यासाठी ही संस्था सुरू करण्याचा उद्देश आहे, असे पवार यांनी सांगितले.

शहाण्यांना अधिक शहाणे करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. यशदा या संस्थेमार्फत (Yashada Institute) या आधी प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन नवीन गोष्ट देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे.

सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे, असेही पवार म्हणाले.

Advertisement