पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात (Pune) जैव सुरक्षा स्तर नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन (Bhumi Pujan) आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी शेती व जोडधंदा विषयी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या शेतीबद्दलच्या जुन्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की “दत्ता भरणे (Datta Bharne) जेव्हा कॉलेजमध्ये (College) होते तेव्हा माझा भाऊही त्यांच्यासोबत होता. माझे वडिल आम्हाला लवकर सोडून गेल्यानंतर माझ्यावरु कुटुंबाची जबाबदारी आली.

त्यावेळी मी शेती करायला लागलो. मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री (Poultry) आणि डेअरीच्या व्यवसायाने केले. तुमचा विश्वास बसणार नाही.

Advertisement

त्या काळामध्ये एक गाय विकली तर त्या किमतीतून एक एकर जमीन विकत घेत होतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. माझ्या बांधाच्या समोर चार एकरांचा एक प्लॉट (Plot) विकायला निघाला होता.

मी चार गायी विकल्या आणि त्या पैशातून मला चार एकर जमीन मिळाली. पण आज ते अशक्य आहे कारण जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.

पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय केला तर शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. हे मी स्वतः अनुभवले आहे आणि त्यामुळे मी सांगत आहे,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

Advertisement

तसेच पुढे ते म्हणाले की “नागरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये माणूस आणि प्राण्याचे जीवाभावाचे नाते आहे. कृषीसंस्कृतीमध्ये पशुपालनाचे मोठे महत्त्व आहे. शेतावरच्या वस्तीवरही कुत्रे पाळले जातात. माणसाचे सच्चे साथीदार म्हणून हे प्राणी आहेत.

देवदेवतांच्या प्रतिमांसोबतही कुठलातरी प्राणी पाहायला मिळतो. शेवटच्या प्रवासाला यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळदेखील रेडा दाखवलेला आहे.

म्हणून माणसाचे आणि प्राण्याचे नाते अनेक शतकांपासून आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Advertisement

यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी माणसाचे आणि प्राण्याचे जीवाभावाचे नाते असल्याचे म्हणून पशुपालन महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.