मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ‘शरद पवार’ (Sharad Pawar) यांच्याविषयी अर्वाच्च आणि आक्षेपार्ह टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिची काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. ठाणे कोर्टाने केतकी चितळेला जामीन मंजूर केला होता.

नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलेच निशाण्यावर धरले असून, तिच्याविरोधात गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे. केतकी चितळे (Facebook post on Sharad Pawar) हीनं एक कविता फेसबुकवरुन शेअर केली होती.

या कवितेतून शरद पवारांवर (Sharad Pawar) वादग्रस्त शब्दांत टीका करण्यात आली होती. यानंतर कळव्यात केतकीविरोधात गुन्हादेखील झाला होता.

Advertisement

दरम्यान, अटक झालेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेची (Ketaki Chitale) कारागृहातून सुटका देखील करण्यात आली आहे. केतकीला 15 मे रोजी अटक करण्यात आली होती.

मात्र, पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला असा आरोप तिनं नुकताच केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे.

यावेळी केतकी (Ketaki Chitale) म्हणाली, “तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं.

Advertisement

बेकायदापद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार.

पण पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला.

कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला. असं अभिनेत्री केतकी चितळे यावेळी म्हणाली.

Advertisement