Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

“मी पुन्हा येईन!’ पुन्हा संधी मिळणारच आहे : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पुन्हा एकदा “मी पुन्हा येईन’चा नारा दिला आहे. आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, असे त्यांनी सांगितल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माथाडी कामगार चळवळीसाठी आमच्या सरकारने सर्व दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते, माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता तर उरलेले प्रश्नही सोडवले असते,” असेही फडणवीस म्हणाले.

या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणारच आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असते.

Advertisement

कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत. माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र पाटील आणि इतरांची उपस्थिती होती.

Leave a comment