मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शिवसेना भवनातील (Shivsena Bhawan) पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. ताशा प्रकारचे ट्विट कंबोज यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावरहही गंभीर आरोप केले आहेत.

तसेच मोहात कंबोज आणि सुधीर मुनगंटीवार (Sudir Mungantivar) यांच्यावर ही आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.

Advertisement

याच आरोपांना मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे आपल्या घरी आले होते आणि अनेक वर्षे ते गणपतीसाठी येतात, असं सांगत कंबोज यांनी राऊतांसोबतचा एक फोटोही दाखवला.

इतकंच नाही तर राऊतांनी गरज भासल्यानंतर आपल्याकडे पैशांचीही मागणी केली होती असा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. ट्विट करत त्यांनी झालेल्या व्यवहाराचा तपशीलही दिला आहे.

ट्विट ला मेरा पैसा वापस कर असे कॅप्शनही दिले आहे. राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. 4 सप्टेंबर 2017 ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात.

Advertisement

Advertisement

मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय.

त्याचबरोबर कंबोज यांनी राऊतांना दिलेल्या पैशांचा व्यवहारही उघड केला होता. पैशांचा व्यवहार झाल्याचा पुरावाही कंबोज यांनी दिला आहे.

Advertisement