मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. त्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि भाजपवर टीका केली आहे.

संजय राऊत यांची आज शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) ४ वाजता पत्रकार परिषद (Press Conference) होणार आहे. राऊत या पत्रकार परिषदेमध्ये काय गौप्यस्फोट करणार याकडे महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेचे लक्ष लागले आहे.

मुंबईत (Mumbai) सद्य भगवं वादळ वपहाय्ला मिळत आहे. संजय राऊत यांच्या ४ वाजता शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी सुरु आहे. राज्यभरातून कार्यकर्ते नेतेमंडळी मुंबई आणि शिवसेना भवनात दाखल होताना दिसत आहेत.

Advertisement

मै झुकेगा नहीं असे टीशर्ट वर छापून अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत काय रहस्य उलगडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शिवसैनिकांना गर्दी टाळण्याचे आव्हान केले आहे. शिवसेना भावनाबाहेर कडक पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement