मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, ही उलथापालथ झाल्यानंतर देखील शिंदे गटाचे समर्थक सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

नुकतंच, शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम (ramdas kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही (ajit pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या राज्यात शिवसेना दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे पहिला मिळत आहे.

रामदास कदम म्हणाले, ‘ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. त्यादिवशी बाळासाहेबांचा विषय त्यांच्यासाठी संपला.

आता ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं काय घेऊ शकतात? बाळासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर संघर्ष करण्यात घालवलं. आता उद्धव ठाकरे त्याच शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.’ असं ते म्हणाले.

रामदास कदम (ramdas kadam) यांनी यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांना देखील चालंगलाच टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.

त्यांनीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली, नाहीतर अजित पवारांनी सर्व शिवसेना खाऊन टाकली असती, पुढील काही वर्षांमध्ये काहीच शिल्लक राहिलं नसतं’.