मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या वागणुकीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडला असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकर यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मंगळवारी पत्रकार परिषद (Press conference) झाली आहे. त्यांनतर राजकारणात पुन्हा राणे (Narayan Rane vs Shivsena) विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या हल्लाबोल नंतर नारायण राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर पुन्हा शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत घेत विनायक राऊतांनी राणेंचा इतिहास आणि लायकी काढली आहे.
तसेच मिलींद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी राणेंना ट्विट करून सुनावले होते. मात्र आता माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.
यावेळी निलेश राणे म्हणाले की, विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा इतिहास कच्चा आहे. आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीचे राजकारण दिल्लीत करत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली.
अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते, तर तो निर्णय घेतला नसता, असे निलेश राणे म्हणाले आहेत. तर पुढे त्यांनी मिलींद नार्वेकरांना तिकीट विकणारा एजंट आहे, म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.