आंबील ओढ्यानजीकची अतिक्रमणे काढण्यावरून भारतीय जनता पक्षाला सर्वांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. न्यायलयाने स्थगिती दिली असली, तरी त्यावरचा गदारोळ सुरू झाला आहे.

महापाैरांवर हल्लाबोल

आंबील ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.

“पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबील ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असं सुळे म्हणाल्या.

Advertisement

यंत्रणांचा वापर विरोधकांसाठी

सुळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या छापेमारीवरुनही भाष्य केलं. “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं.

आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवार यांना नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे; मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे” असं सुळे म्हणाल्या.

आमचं प्रगतीचं राजकारण

आमचं राजकारण हे प्रगतीचं राजकारण आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहोत. तिसरी लाट कधी येईल याची चर्चा होईल. आता 24 तास महाविकास आघाडी तिसरी लाट रोखण्यात, त्याच्या उपाय योजनांमध्ये व्यस्त आहे, असं सुळे यांनी सांगितलं.

Advertisement