Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

वारक-यांना धाक दाखविला, तर महाराष्ट्र पेटून उठेल..

“राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक वारकरी आता पायी निघणार आहेत. शांत आणि संयमी वारकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून सरकारने घाबरवू नये.

आमचा या सरकारला हा शेवटचा इशारा आहे, की वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्यात या सरकारची होळी होईल” अशा शब्दांत आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

वारीवरील बंदीला विरोध

कोरोना विषाणूच्या साथीमुळे राज्य सरकारने मागच्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला बंदी घातली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नय़े, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे; पण यामुळे काही वारकऱ्यांमध्ये अस्वस्थतता आहे. सरकाराचा हा निर्णय त्यांना मान्य नाही. त्यांनी पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप वारक-यांसोबत

असंख्य वारकरी पायी वारी करणार असून पोलिसांनी अनेक वारकऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सरकारला ठणकावले आहे. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी वारकऱ्यांच्या सोबत आहे, असे भोसले यांनी सांगितले.

 

Leave a comment