आज-काल अनेक लोक यूरिक ॲसिडच्या समस्या त्रस्त आहेत. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, जर यूरिक ॲसिड ची समस्या शरीरात अधिक प्रमाणात असेल तर किडनी फेल्युअर आणि हार्ट अटॅकची समस्या देखील होऊ शकते. ज्यामुळे यूरिक ॲसिड वर नैसर्गिक रित्या नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यासाठी तुम्हाला खाण्याच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजे. युरिक अॅसिडच्या समस्येमध्येही फळांचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.
ही फळे खाल्ल्याने युरिक अॅसिड नियंत्रित राहते
-शरीरातील वाढलेले यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा. यात असलेले घटक वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
-वाढणारे यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी चेरीचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. यात अँथोसायनिन आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे वेदनासह सूज कमी करतात. तसेच, ते यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करते.
-केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. केळी सांधेदुखीच्या रुग्णांनी रोज खावी.
-यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी सफरचंद देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये असलेले फायबर यूरिक अॅसिड कमी करण्याचे काम करते.
-यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचाही समावेश करू शकता. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते आणि ते शरीरातील घाण देखील काढून टाकतात.