Breaking News Updates of Pune

तुमची पुरेशी झोप न झाल्यास वाढू शकते जाडी

 सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे जाडी वाढणे , स्थूलपणा येणे या अशा अनेक विकारांना बळी पडावे लगत आहे. आज युवक – युवतींना जाडी वाढण्याची समस्या भेडसावत आहे.

यासाठी अनेक उपाययोजना , औषधे ही मंडळी घेतात. परंतु जाडी वाढण्याच्या मुळापाशी आपल्याला गेले पाहिजे. आहारातील बदल, व्यायामाचा अभाव ही तर जाडी वाढण्याची मुख्य कारणे आहेतच

परंतु अमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात झोप कमी मिळणे हेही जाडी वाढण्याचे एक कारण असू शकते असे आढळून आले आहे.

पुरेशी झोप घेतली नसेल तर शरीरामध्ये घेरलीन नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. या हार्मोनमुळे भूक लागत असते.

परंतु त्याचे पाझरणे विस्कळीत झाल्यामुळे जेवणाचा पॅटर्नही विस्कळीत होतो आणि जेवणातला नियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबी जमा व्हायला लागते.

त्याचप्रमाणे झोपेच्या वेळा आणि झोपेचा पॅटर्न बदलला की, मेंदूमध्ये होणार्‍या प्रक्रिया विचलित होतात आणि परिणामी माणसाला अधिक उष्मांक पुरवणारे अन्न खाण्याची वासना होते आणि त्यामुळे जाडी वाढते.

शारीरिक कष्टासोबतच माणसाला झोपेची आवश्यकता असते, पण तिच्यात नियमितता नसेल तर शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये हॅवॉक निर्माण होतो.

त्यातून मधुमेहासारखे विकार सुद्धा बळावू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भूक, पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि मन:स्थिती या सर्वांचेच अनियमित झोपेने खूप नुकसान होत असते आहे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.