मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची शस्त्रक्रिया (Surgery) झाल्यामुळे बरेच दिवस झाले ते कामावर नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून (Opposition) मुख्यमंत्री (CM) पदाचा कारभार दुसरा कोणाकडे तरी द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदभार काही काळासाठी का होईना अजित पवार (Ajit Pawar) किंवा त्यानच्यावर विश्वास नसला तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे द्यावा अशी मागणी भाजपचे (BJP) आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया (Cervical spine Surgery) झाली, तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री (CM) नसल्याने महाराष्ट्र निर्णायकी झाला असून मंत्रिमंडळही भरकटले आहे.

Advertisement

अगोदरच कोरोना महामारीचे संकट वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत असून राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत.

अशा स्थितीत, मुख्यमंत्री मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन कारभारातही लक्ष घालू शकत नसल्याने राज्याचे अतोनात नुकसान होत आहे.

दीर्घकाळ अनुपस्थित असल्यास पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच ती वेळ आहे.

Advertisement

आता राज्याला अधिक अस्थिरतेकडे ढकलण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हस्तांतरित करून ठाकरे यांनी राज्यकारभारात स्थैर्य आणावे अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे (MLA Niranjan Davkhare) यांनी केली आहे.

अजितदादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) विश्वास नसला तर मुख्यमंत्री पदाचा कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी देखील निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

Advertisement