सिंधुदुर्ग : भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना संतोष परब हल्लाप्रकरणात (Santosh Parab Attack) १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली होती. आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यादरम्यान नितेश राणे यांची प्रकृती खालावली होती.

नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखणे, उलट्या होणे अशाप्रकारचे त्रास होत होते. पण जमीन मंजूर झाल्यानंतर नितेश राणे यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारताना होत असल्याचे दिसत आहे.

नितेश राणे यांची जामीन मंजूर झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे विरोधकांनी राणेंवर सडकून टीका केली आहे. राणेंचा आजार हा राजकीय आजार असल्याची टीका करण्यात येत आहे.

Advertisement

नितेश राणे यांनी जामीन (Bail) मंजूर झाल्यानंतर त्यांना काय त्रास होत आहे हे सांगितले आहे. नितेश राणे म्हणाले, ”मी जरी कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मला आजही त्रास होतोय”.

त्यामुळे मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार असल्याचे राणेंनी सांगितले आहे. “मला पाठिच्या मनक्याचा त्रास होत आहे. माझी शुगर लो आहे.

मात्र तरीही काही जण म्हणतात की माझा आजार हा राजकीय होता”, मग डॉक्टरांनी केलेल्या टेस्ट खोट्या होत्या का? असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला आहे.

Advertisement

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवरही (CM) निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, डॉक्टरांनी माझा आताच बीपी चेक केला. माझा बीपी १५२ पर्यंत लो झाला आहे.

मग डॉक्टरांनी आतापर्यंत माझ्या ज्या काही टेस्ट केल्या त्या खोट्या आहेत का? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही.

प्रश्न आम्ही देखील विचारू शकतो. जेव्हा सरकार पाडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो.

Advertisement

अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच त्यांना कोरोना कसा होतो? असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.