file photo

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी देशभरात अनेक नवनवीन रस्ते निर्मिती केली आहे. मात्र यावेळी त्यांनी २ किलोमीटर रस्ता मी बनवू शकलो नाही अशी खंत व्यक्त केली आहे.

नितीन गडकरी नागपुरमध्ये (Nagpur) एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आपण देशभरात रस्ते बांधले पण आपल्या स्वत:च्या घरासमोर दोन किलोमीटरचा रस्ता बांधू शकलो नाही. असे ते बोलले आहेत.

तसेच दिल्ली एक्सप्रेस वे (Delhi Express Way) हा एक लाख कोटी रुपयांचा रस्ता दोन वर्षांत झाला पण हा दोन किलोमीटरचा रस्ता करता करता थकलो असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Advertisement

त्याचसोबत त्यांनी पुढे नागपूर मेट्रोचे ( Nagpur Metro) कौतुक करत ही मेट्रो प्रति किमी ३५० कोटीच्या भांडवली खर्चातून बांधलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

व सरकारमध्ये चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार होत नाही व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन दिले तर त्याचे मोटिवेशन (Motivation) आणखी वाढते. मी एकदा गाडीतून जात असताना मेट्रोच्या खालील झाडे वाढलेली दिसली.

Advertisement

कुठे वाळलेले झाड मला दिसले तर मी पीडब्ल्यूडी असो किंवा आणखी कुणी त्याला तात्काळ विचारतो. असेही ते म्हणाले आहेत.