ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत.

याच मुद्दयावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला.

धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही, असं त्या म्हणाल्या.

Advertisement

दुसरीकडे पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.

“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम १२५ देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. ७७ टक्के या कामात स्त्रिया आहेत. ७ ऑगस्ट २०१५ पासून हातमागदिन साजरा केला जातो.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ ७ ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे ७ ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे.

Advertisement

देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापऱ्यायच्या.”, असं उद्घाटन कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या.