कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिमीटरची मागणी वाढलेली असताना तामिळनाडू पोलिसांनी लोकांना बनावट ऑक्सिमीटर ॲप डॉलनलोड न करण्याचा इशारा दिला आहे. अशा ॲपच्या माध्यमातून आपली वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याचा दावा करणाऱ्या बोगस ऑक्सिमीटर ॲपपासून सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

महामारीच्या काळात लोकांमध्ये वाढत चालेल्या चिंतेचा फायदा सायबर गुन्हेगारांकडून उचला जात आहे. सायबर गुन्हेगार संशयित लिंक आणि ॲप पाठवून लोकांच्या वैयक्तिक माहितीबरोबर बोटांचे ठसे यासारख्या बायोमेट्रिक माहितीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

यासाठी बनावट ऑक्सिमीटर ॲपचा गोरखधंदा गुन्हेगारांकडून चालवला जात आहे, असा इशारा तामिळनाडू पोलिसांनी दिला आहे. अशा प्रकाराचे ॲप डॉलनलोड केल्यानंतर वापरकर्त्यांना एसएमएस पाठवले जातात.

Advertisement

याद्वारे संबंधिताच्या मोबाईलमधील विविध फिचरपर्यंत पोहोचण्याची परवानगी मागितली जाते. वापरकर्ता जर या जाळ्यात अडकला, तर सायबर गुन्हेगार ओटीपी, फोनमधील पासवर्ड, महत्त्वाच्या कार्डची माहिती, फोटो, नंबर आणि बायोमेट्रिकसारखी माहितीची चोरी करू शकतात.

याचा वापर गुन्हेगारांकडून बँकिंग सेवा आणि इतर संवदेनशील कामासाठी केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर बोटांच्या ठसांचा वापर आधार संबंधित देवाणघेवाण प्रक्रियेसाठी केला जाऊ शकतो.

त्यामुळे ॲपच्या माध्यमातून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याचा दावा करणाऱ्या ॲपपासून सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांनी यापूर्वीच अशा फसवणुकीबाबत इशारा जारी केला होता.

Advertisement