पुणे – पुणेकरांना (pune) पुढील दोन दिवस पाण्याचा (water) जपून वापर करावा लागणार आहे. कारण उद्या गुरुवारी (दि. 25) पुणे शहरातील सर्वच भागात पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (water supply) राहणार आहे. तसेच दुसऱ्यादिवशी म्हणजेच, शुक्रवारी (दि. 26) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा (water supply) विभागाकडून शहरातील नागरिकांना याबाबत नोंद घेऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

ऐनवेळी पाणी आलं नाही, म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी लोकांनी बुधवारीच पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज आहे. असं देखील महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

म्पिंग आणि पॉवर सप्लायबाबत महत्त्वपूर्ण कामं करण्यासाठी पुणे शहरातील महत्त्वाच्या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

या भागात पाणीपुरवठा होणार नाही….

पुणे शहरातील कोथरुड, वारजे, पौड रोड, बाणेर, बालेवाडी, बावधन, पाषाण, सूस रोड, कर्वेनगर, कर्वे रोड, डेक्कन जीमखाना, औंध, बोपोडी हा आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात एक दिवस पाणीबाणी जाणवणार आहे.

का पाणी कपात?

चांदणी चौक, गांधी भवन, एसएनडीटी, पर्वती, जुन्या आणि नव्या होळकर पम्पिंक आणि चतुश्रुंगी येथील ओव्हरहेड टँकचा विद्युत पुरवठा आणि पम्पिंगबाबत पाणीपुरवठा विभागाला काम करायचं आहे.

त्या कारणासाठी एक दिवस पुण्यातील महत्त्वाच्या भागात पाणी पुरवठा (water supply) बंद राहिलं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच दुसऱ्यादिवशी म्हणजेच, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.