पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता पुणे वाहतूक पोलीस विभागाने (Pune City Traffic Police) सिग्नल वेटिंगची वेळ वाढवली आहे. होय, शहरातील गर्दी कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिक जॅमवर (Traffic jam) लक्ष ठेवण्यासाठी हे करण्यात आले आहे. 90 ते 120 सेकंदांचा प्रतीक्षा वेळ आता 150 ते 180 सेकंदांपर्यंत वाढवण्यात आला आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वादनाची गर्दी होत असते आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील रस्त्यावरून चालताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो, आणि त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी (Traffic jam) आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

काही रस्त्यांवर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (Pune metro project) सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे, तर खड्ड्यांमुळे प्रवाशांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरात वाहनांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे रहदारीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी मार्ग शोधत राहण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (Pune City Traffic Police) याविषयी म्हणाले, की वाहतूक जलद होण्यासाठी आणि रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस विभागाकडून आता शहरात आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

उदाहरणार्थ, गंगाधाम चौकात, वेटिंगची वेळ आता 150 सेकंदांवर गेली आहे, कारण हा चौक मुख्य रस्त्यांना सर्व बाजूंनी जोडतो.

विविध चौकांत सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी मोठ्या वाहतूककोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना वाहतूक पोलिसांकडून (Pune City Traffic Police) करण्यात येत आहेत.