Pune Traffic News : गेल्या काही वर्षांपासून पुणे, मुंबई आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून हे मेट्रोचे जाळे विकसित केले जात असून पुण्यातही मेट्रोची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. या मेट्रो प्रकल्पांच्या कामामुळे पुणे शहरात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना मोठा फटका बसत असून पुणेकरांसाठी नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर पुणे शहरात आतापर्यंत दोन मेट्रो मार्ग सुरू झाले असून या मार्गांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास हा खूपच जलद झाला आहे.
दरम्यान, पुणे शहरात अजूनही काही प्रस्तावित मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. या मेट्रोच्या कामांमुळे मात्र पुण्यातील जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
अशातच आता मेट्रोच्या कामांमुळे शहरातील काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मेट्रो प्रकल्पांच्या कामामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल केला जाणार असून हा बदल उद्यापासून अर्थातच 18 मे 2024 पासून लागू होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिमला ऑफिस चौका जवळ मेट्रोची कामे केली जाणार आहे. येथे मेट्रो स्टेशनचे गार्डन लॉन्चिंग आणि पिलरचे बांधकामाचे काम केले जाणार असून या कामासाठी सिमला ऑफिस चौक व परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे.
दरम्यान आता आपण या मेट्रोच्या कामांमुळे कोणत्या रस्त्यांवरील वाहतूक बंद राहील आणि पर्यायी मार्ग कोणते राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
1)वीर चाफेकर चौकातून एफसी रोड वरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे. यामुळे वाहन चालकांना चाफेकर चौकातून सरळ न.ता. वाडी चौकात जावे लागणार आहे आणि तेथून उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक गाठता येणार आहे. दरम्यान, वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी केला जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या या बदलानुसारचं प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
2)वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार आहे. यामुळे वाहनाचालकांना या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौकाच्या डावीकडे वळून न.ता.वाडी – उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे जावे लागणार आहे.
3) मिळालेल्या माहितीनुसार, न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक या मार्गावर देखील वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग अर्थातच न.ता. वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक असा प्रवास करावा लागणार आहे.
4) तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मेट्रोच्या कामांमुळे वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास बंदी राहणार आहे.
5)स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर देखील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.