पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (pune rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) देखील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. 

काल पुण्यात मोसमातील चांगला (pune rain) आणि जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. उकाडा आणि पाणीटंचाई (Water shortage) यामुळे वैतागलेल्या पुणेकरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आता पुणेकरांना पावसाच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि 7 आणि 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून, ऑरेंज अलर्ट (Orange alert) हवामान खात्याने जारी केला आहे.

तसेच, नागरिकांनी सुद्धा मुसळधार पावसासाठी तयार राहा असा इशाराच देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवस नागरिकांनी देखील आपली काळजी घेणे आवश्यक आहे.

पुणे आयएमडी हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाटात 6 जुलै ते 8 जुलै या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

7 जुलैपासून मुसळधार (24 तासांच्या कालावधीत 204.5 मिमी इतका किंवा त्याहून अधिक) पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं देखील त्यांनी सांगितलं आहे.