पुणे – पुणे शहरात (pune) आज पासून म्हणजेच दि. 11 जुलै 2022 नंतरही दैनंदिन पाणीपुरवठा (water supply) होणार असून, 26 जुलैपर्यंत शहरातील पाणीपुरवठा (water supply) दैनंदिन स्वरूपातच होणार आहे. सध्याची धरणांतील पाणी पातळी ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर 26 जुलैच्या साठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन जाहीर केले जाईल.

अशी माहिती पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली आहे. यासंदर्भातील एक फेसबुक पोस्ट देखील त्यांनी शेअर केली आहे.

पुणेकरांना (pune) पुढील काही दिवस पाण्याचा (water) जपून वापर करावा लागणार आहे. असं सांगण्यात आलं होत.

कारण 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत पुणे शहरातील सर्वच भागात एक दिवसाआडच पाणी पुरवठा (water supply) केला जाणार.

तसेच, त्यानंतर म्हणजेच, 12 तारखेला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होण्याची शक्यता वर्तण्यात आली होती.

सध्या पावसाला सुरूवात झाली असली तरी काही भागात, परिसरात पावसाअभावी पाणी टंचाई (Water shortage) तीव्र झाली आहे. असं सांगण्यात आलं होत.

मात्र, आता या निर्णयात बदल करण्यात आला असून. दि. 11 जुलै 2022 नंतरही दैनंदिन पाणीपुरवठा होणार असून, 26 जुलैपर्यंत शहरातील पाणीपुरवठा दैनंदिन स्वरूपातच होणार आहे. असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

त्यामुळेच आता शहराच्या सर्व भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा (water supply) चालू होता. तो निर्णय मागे घेण्यात आला असून, यापुढे सुरळीत पाणीपुरवठा (water supply) होणार आहे.