विरार: शिवसेना विभागप्रमुख असलेले जितू खाडे यांनी रिक्षामध्ये महिलेची खोड केल्याने पीडित महिलेने त्यांना चपलेने चोप दिला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिका-याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

जितू खाडे हे विरार पूर्वेतील साईनाथ नगर या ठिकाणचे हे विभाग प्रमुख असून त्यांनी रिक्षामधून जात असताना फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता. यामुळे संतप्त झालेल्या पीडित महिलेने आयटम चाहीये?, असं म्हणत शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला रिक्षातच चपलेने मारहाण केली.

असं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. पीडित महिलेनं जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

Advertisement

या प्रकारचा विडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. परंतु पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी आहे.

घडलेल्या प्रकारचा शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. व जितू खाडेच्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असं सांगितलं आहे.

Advertisement