पुणे – दरवर्षी ‘पुष्टीपती विनायक जयंती’चे औचित्य साधून पुण्यातील (pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (dagadusheth ganapati mandir) मंदिरा ‘शहाळे महोत्सव'(Coconut Festival) साजरा केला जातो. यंदा देखील हा महोत्सव साजरा करण्यात असून, यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati Bappa) बाप्पाला 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे.

वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न (Health) भारताकरीता

Advertisement

दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर (Dagdusheth Ganpati Bappa)प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार.

आणि याचेच औचित्य साधत आज बाप्पाला शहाळ्यांचा महानैवेद्य (Coconut Festival) दाखविण्यात आला आहे.

Advertisement

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव (Coconut Festival) आयोजित करण्यात आला.

शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. सोमवारी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला.

तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.

Advertisement

श्री पुष्टीपती विनायक जयंतीचे माहात्म्य

श्री गणेशाचे विविध अवतार भाविकांना पुराणात पाहायला मिळतात, त्यापैकीच एक म्हणजे ‘श्री पुष्टीपती विनायक’!
दुर्मती राक्षसाने सृष्टीमध्ये हाहाकार माजवला होता.

त्याचा वध करण्यासाठी सर्व देवांनी मिळून मंगलमूर्ती गजाननाची प्रार्थना केली. माता पार्वतीला दिलेल्या वरदानानुसार त्यांच्या घरी म्हणजेच कैलासावर श्रींनी अवतार घेतला व व दुर्मती राक्षसाचा वध केला.

Advertisement

भगवान श्री हरी विष्णू व श्री महालक्ष्मी मातेची कन्या ‘पुष्टी’ हिच्याशी मंगलमूर्तींचा विवाह झाला आणि भगवंत पुष्टीपती झाले.

वैशाख शुध्द पौर्णिमेच्या दिवशी अवतार घेतल्याने या दिवशी ‘श्री पुष्टीपती विनायक जयंती’ साजरी केली जाते.

Advertisement