ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

तिचा चेहरा समोरच…दहा वर्षे झोप हरवली…

लग्नाचा हट्ट धरलेल्या प्रेयसीचा त्यानं खून केला; परंतु या खुनानं त्याच्या मनावर आघात झाला. समोर सातत्यानं तीच दिसायची.. दररोज रात्री दचकून उठायचो…घाबरायचो…झोपच हरवून गेली…

दहा वर्षानंतर खुनाला फुटली वाचा

दहा वर्षांपूर्वी प्रेयसीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अटक केल्यानंतर त्यानं पोलिसांजवळ हे कथन केलं.

किशोर लक्ष्मण घारे (रा. डोणे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चांदणी सत्यवान लांडगे (२२, रा. बलदेवनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

लग्नाच्या बहाण्यानं नेऊन खून

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर आणि मयत चांदणी यांचे प्रेमसंबंध होते. चांदणीची गर्भधारणा झाल्याने तिने किशोरकडे लग्नासाठी तगादा लावला.

त्यामुळे चिडलेल्या किशोर याने लग्नाच्या बहाण्याने नेऊन चांदणीचा खून केला व मृतदेह जंगलात फेकून दिला. त्यानंतर दहा वर्षांनी वाकड पोलिसांना चांदणीचा खून झाल्याची कुणकुण लागली.

त्यानुसार, त्यांनी किशोरला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांने चांदणीला लग्नाच्या बहाण्याने नेऊन खून केल्याची कबुली दिली. अलीकडेच त्याने मारुंजी येथे भाजी विक्रीचा व्यावसाय सुरू केला होता.

नेमकी घटना काय ?

पिंपरी येथील बलदेवनगरमधील चांदणी लांडगे ही तरुणी २०११ला घरातून निघून गेली होती. प्रियकर किशोर घारे याच्यासोबत ती बेपत्ता झाली होती. दोघेही लग्न करून पळून गेले असतील असा अंदाज घरच्यांना होता.

चांदणीच्या आईने चांदणीच्या मोबाईलवर सतत संपर्क साधला होता; पण प्रत्येक वेळा किशोरच फोन घेत असे. चांदणीच्या आईने पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ही दिली होती.

किशोरही त्याच्या गावातून बेपत्ता असल्याने पोलिसांनी दोघे लग्न करून दुसरीकडे कुठे तरी राहात असतील असा अंदाज बांधला. त्यानंतर हा तपास रखडला.

तपास कसा लागला ?

पोलिस अधिकारी संतोषराव पाटील यांची नियुक्ती वाकडला निरीक्षक म्हणून झाली. काही मिसिंग केसचा आढावा घेत असताना त्यांना चांदणी लांडगे मिसिंग केस शंकास्पद वाटली. त्यांनी काही खबऱ्यांना माहिती काढण्याचे काम सोपवले.

 

You might also like
2 li