कोरेगाव भीमा येथे मोबाईल दुकानमध्येकामाला असलेल्या कामगाराने दुकानातील दुरुस्तीलाआलेले मागडले मोबाईल, काही रक्‍कम व दुकान मालकाची दुचाकी चोरुन नेली.

तुषार संभाजी आव्हाळे(वय २२ रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा )यांनी शिक्रापूरपोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विजयअंगद तरटे (सध्या रा. ढेरंगेबस्ती कोरेगाव भीमामूळ रा. सावळेश्वर ता. मोहळ जि. सोलापूर )याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आव्हाळे यांचे ओमसाई टेलीकॉम नावाने मोबाईल दुकान असून त्यांच्यादुकानात विजय तरटे हा युवक कामाला आहे. ४ सप्टेंबररोजी विजय हा दुकानातील महागडे मोबाईल पुण्यालादुरुस्त करण्यासाठी घेऊन जातो,

Advertisement

असे म्हणून मोबाईलतसेच दुकानातील काही रक्‍कम घेऊन आव्हाळे यांचीदुचाकी घेऊन गेला. मात्र त्यांनतर तो दुचाकी व घेऊनगेलेले मोबाईल घेऊन दुकानात आलाच नाही तसेचउडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यामुळे दुकानातीलकामगार मुलाने आपला विश्‍वासघात करून फसवणूककेल्याचे निदर्शास आल्याने फिर्याद दिली.पुढील तपासपोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.

Advertisement