सध्या लॉकआउट असल्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक सेवांमधील मंडळी बाहेरून घरी आल्यावर कपडे, मोजे, कापडी पिशवी चमचाभर डेटॉल,
सॅव्हलॉन असे जंतुनाशक औषध बादलीभर पाण्यात टाकून वेगळ्या बादलीत १० मिनिटे भिजत ठेवावेत आणि नेहमीप्रमाणे धुवावेत. बॅग, सॅक अशाच नेहमीच्या जंतुनाशकांनी पुसून घ्याव्यात.
इतर गोष्टींसाठी डेटॉल, लायझॉल, ओडोबॅन असे जंतुनाशक स्प्रे मिळतात. त्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येतील. त्याचप्रमाणे शिजवलेलेच अन्न खावे. भाज्या आणि कांदादेखील शिजवूनच खावा.
५५ अंश सेल्सिअसच्या पुढे करोना आणि इतर सर्व विषाणू नष्ट होतात. आपले अन्न स्वच्छ आणि जंतुविरहित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
फळे आणि फळभाज्या मीठ अथवा सैंधव वापरून धुतल्यास उत्तम. त्याचा वापर जंतुनाशकाप्रमाणे होईल आणि ते रासायनिक नसल्याने, त्यानंतर फळे खायलाही सुरक्षित राहतील. पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि शिजवून खाव्यात.