Pune : जिल्ह्यातील ९७६९ जणांना शनिवारी करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १३ लाख ९८ हजार ४५६ एवढी झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील १७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १९,४४६ झाली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण २८,४९१ चाचण्या करण्यात आल्या, त्यांपैकी १२,६७२ चाचण्या पुणे शहरात झाल्या. त्यामुळे शहरात ४२.६९ आणि जिल्ह्यात ३४.२८ टक्के संसर्गाचा दर नोंदवण्यात आला.

दिवसभरात आढळलेल्या ९७६९ नवीन रुग्णांपैकी ५४१० रुग्ण पुणे शहरातील तर २६४५ रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. उर्वरित ग्रामीण भागातील १७१४ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरातील सात, पिंपरी-चिंचवडमधील चार आणि ग्रामीण भागातील सहा रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील ८२१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ५ लाख ९० हजार ७१२ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील ४८७४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

Advertisement

– पुणे – ५४१० नवे रुग्ण, सात मृत्यू

– पिंपरी-चिंचवड – २६४५ नवे रुग्ण, चार मृत्यू

– ग्रामीण भाग – १७१४ नवे रुग्ण, सहा मृत्यू

Advertisement