Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

निर्बंधाविरोधात व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कोरोनाची साथ नियंत्रणात येऊनदेखील निर्बंध कमी केले जात नसल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेकडून दिलासा मिळाला नसल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

जगायचे कसे ? 

महापालिका, राज्य शासना अशाच पद्धतीने काम करणार असेल तर आम्ही नोकरांचे पगार कसे द्यायचे, भाडे कसे द्यायचे, बॅंकांचे हप्ते कसे फेडायचे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या निर्बंधामुळे व्यापाऱ्याचे मरण होत आहे, त्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी व्यवसायासाठी मोकळीक द्या अशी मागणी केली आहे.

Advertisement

निर्बंधाचा आदेश काढल्याने संताप

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. यामध्ये दुकाने सायंकाळी चार वाजता बंद करावी लागणार असून, शनिवार-रविवारचा वीकएंड टाळेबंदी कायम असून, मॉलदेखील बंदच असणार आहेत.

दरम्यान, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाही बाजारपेठांवर निर्बंध आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्बंध शिथिल करा दुकाने रात्री आठ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या अशी मागणी लावून धरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन दिले होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत मंत्रालयातून निर्णय होईल असे स्पष्ट केले होते; पण अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच महापालिकेने निर्बंध कायम असल्याचा आदेश काढल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.

Advertisement

उपनगरात निर्बंध धाब्यावर

दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत असावी आणि शनिवार-रविवारी देखील दुकाने सुरू असावेत अशी आमची मागणी आहे. यासाठी वारंवार पाठपुरावादेखील सुरू आहे.

उपनगरे व ग्रामीण भागात नियमांची कडक अंमलबजावणी नाही; पण शहराच्या मध्यवर्ती भागात कडक नियम आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत असून, आमचे ग्राहक तुटत आहेत, असे व्यापारी सांगतात.

 

Advertisement

 

Leave a comment