कोरोनाच्या दुस-या लाटेचा घरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. एकीकडे बांधकाम खर्चात वाढ होत असताना दुसरीकडे बंगळूर, मुंबई वगळता अन्य शहरांत घरांच्या विक्रीत घट झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही विक्री ३३ टक्क्यांनी घटली आहे.

मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र विक्रीत वाढ

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे घरांची विक्री कमी झाली आहे. तथापि, गेल्या वर्षाशी तुलना केली, तर या तिमाहीत घर विक्री 83 टक्क्यांनी वाढली आहे.

जेएलएल इंडियाच्या नवीन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे, की एप्रिल ते जून या तिमाहीत निवासी मालमत्तांची विक्री 19 हजार 635 युनिट होती.

Advertisement

जानेवारी ते मार्च या तिमाहीत ती 25 हजार 583 युनिट आणि गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत 10 हजार 753 युनिटची विक्री झाली आहे.

बंगळूरमध्ये घर विक्रीत ४७ टक्के वाढ

दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद आणि पुणे येथे निवासी मालमत्तांच्या विक्रीवर जेएलएल इंडिया देखरेख करते. मुंबई अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई येते.

मागील तिमाहीत बंगळूरमधील घर विक्री 47 टक्क्यांनी वाढून साडेतीन हजार युनिट झाली आहे, जी गेल्या तिमाहीत दोन हजार 382 युनिट होती.

Advertisement

चेन्नईत सर्वाधिक फटका

चेन्नईतील घर विक्री 81 टक्क्यांनी घसरून तीन हजार दोनशे ते सहाशे युनिट पर्यंत घटली. दिल्ली-एनसीआरमध्येही घर विक्री 55 टक्क्यांनी घसरून दोन हजार 440 युनिटवर आली. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ही आकडेवारी पाच हजार 448 युनिटची होती.

हैदराबादमधील घर विक्री तीन हजार 709 युनिटवरुन तीन हजार 157 युनिवर आली. कोलकाता येथे निवासी युनिट्सच्या विक्रीत 56 टक्क्यांनी घट झाली. एक हजार 320 युनिट्सच्या 578 युनिटवर आली.

मुंबईतील घरांच्या विक्रीत किरकोळ सुधारणा

मुंबईतील घर विक्रीत किरकोळ वाढ होऊन पाच हजार 779 युनिटवरुन पाच हजार 821 युनिटवर गेली.

Advertisement

दुसरीकडे पुण्यातील घर विक्रीत सहा टक्के घट होऊन तीन हजार 539 युनिट झाली, जी मागील तिमाहीत तीन हजार 745 युनिट्स होती.

आकडेवारीनुसार एप्रिल ते जून, 2020 दरम्यान बंगळूरमध्ये निवासी युनिटच्या विक्रीमध्ये 1,977 युनिट, चेन्नई 460 युनिट्स, दिल्ली-एनसीआर 2,250 युनिट, हैदराबादमध्ये 1,207 युनिट्स, कोलकातामध्ये 481 युनिट्स, मुंबईमध्ये 3,527 युनिट्स आणि पुण्यामध्ये 851 युनिट्सची विक्री झाली.

घर खरेदी करणे महागणार

आपण घर विकत घेण्याचा विचार करीत असाल तर हीच योग्य वेळ आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था क्रेडाई म्हणते, की स्टील आणि सिमेंटच्या किंमती वाढल्यामुळे आगामी काळात घराच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

Advertisement

सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीमुळे बांधकाम खर्चात 10-20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे, घरांच्या किंमती मध्यम ते दीर्घ मुदतीच्या कालावधीत वाढण्याची शक्यता आहे.

 

Advertisement