कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलं संक्रमित होण्याचं प्रमाण अत्यल्प होतं; परंतु दुस-या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट मुलं कोरोनाबाधित झाली आणि आता तिस-या लाटेत हा धोका आणखीच वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

२५ हजार मुलं बाधित

मार्च २०२० पासून मे २०२१ पर्यंत शून्य ते दहा वयोगटातील २१ हजार ९११ बालकांना, तर ११ ते १८ वयोगटातील ३६ हजार ७७३ मुलांना कोरोनाची लागण झाली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या उच्चाकांत कोरोनाग्रस्त मुलांची संख्या ११ हजार ७२६ होती.

दुसऱ्या लाटेच्या उच्चाकांत म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात हाच आकडा २४ हजार ५२५ पर्यंत पोहोचला. म्हणजेच दुसऱ्या लाटेत दुप्पट मुलांना कोरोनाची बाधा झाली.

Advertisement

लहान मुलांसाठी अद्याप कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने त्यांची जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे आणि मुखपट्टीचा वापर अनिवार्य असल्याची बाब डॉक्टरांकडून अधोरेखित केली जात आहेत.

लक्षणे फार अगोदर

लहान मुलांमध्ये कोविड-१९ संसर्ग झाल्यास साधारणतः या आजाराची लक्षणे आठवडाभर किंवा महिनाभरसुद्धा दिसून येतात. संशोधनानुसार, कोणतीही दीर्घकालीन वैद्यकीय पार्श्वभूमी परिस्थिती नसलेली मुले किंवा गंभीर कोविड १९ संसर्गात ज्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आलेली आहेत, अशा लहान मुलांना कोरोनातून बरे झाल्यानंतर विविध आजारांचा त्रास होत आहे.

स्नायू दुखणे, अशक्तपणा, वास आणि चव कमी होणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि थकवा मुलांमध्ये दिसून येतो. लाँग कोविड असलेल्या मुलांची संख्या अद्याप माहिती नाही; परंतु मुलांमध्ये लक्षणांमध्ये थकवा, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यांचा समावेश असू शकतो.

Advertisement

मुलांचे कसे संरक्षण करावे ?

मुलांना कमी व्हेंटिलेशन तसेच मर्यादित आणि बंद जागांवर ठेवू नका. मुलांना घराबाहेर जाताना मुखपट्टी लावायला सांगा आणि वारंवार हात स्वच्छ धुवा. फरशी, दरवाजा, हँडल्स आणि नळ यासारख्या पृष्ठभागास स्पर्श केल्यावर हात सॅनिटायझ करा. खोकला किंवा शिंकताना मुलांना तोंड आणि नाक रूमालाने झाकायला सांगा.

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना घरच्या घरी व्यायाम करायला मदत करा. मुलांना नियमितपणे पौष्टिक आहार द्या. बाहेरील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन लहान मुलांना करू देऊ नका. सार्वजनिक ठिकाणी लोकांशी बोलताना सामाजिक अंतर ठेवा.

Advertisement