पुण्यातील हायटेक कंपनी अॅक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायूदूत’चे आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाऑईस ‘एएफ-100’ व ‘एएफ-60’ या मशिनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

हे होते उपस्थित

पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अॅक्युरेट गेजिंग एजिमेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंखे, संचालक संभाजी दिवेकर, रवीशंकर कुलकर्णी, दिलीप काटकर, प्रवीण थोरवे, सतीश एम, स्वाती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट

मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट हा प्राणवायूदूत 250 एलपीएम. (लिटर प्रति मिनिट) क्षमतेचा असून, जिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील 20 ते 50 बेडच्या हॉस्पिटलची आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे.

Advertisement

याची मांडणी करणे अतिशय सोपे असून, हा 30 मिनिटांच्या आत सेवा देण्यास सज्ज होतो. अत्याधुनिक स्थान/जीपीएस ट्रॅकिंग आणि रियल टाइम (आय. ओ. टी.) मॉनिटरिंगमुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ठरतो.

आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी

प्राणवायूदूत हा पूर्ण मोबाइल, ट्रेलर आरोहित (माउंटेड) आणि कंटेनरमध्ये अशा तीन प्रकारात येतो. यामुळे शहर प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या साहाय्याने 30 ते 50 किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपात्कालीन आवश्यकतांची पूर्तता करता येणे सहज शक्य होणार आहे.

प्राणवायूदूतमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलेंडर्स भरण्यासाठीही वापरता येतो.

Advertisement

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक नंदा लोणकर यांच्यातर्फे कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरसेवक नंदा लोणकर, माजी महापौर प्रशांत जगताप व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Advertisement