Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राज्याला हादरवणारी घटना ! अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचा नरबळी

महाराष्ट्राला हादरवणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. एका सात वर्षीय मुलाचा नरबळी देण्यात आला आहे. या घटनेनं सपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

७ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याचा नरबळी देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीमध्ये नरबळी देण्यात आळा आहे. अपहरण केलेल्या 7 वर्षीय आरव केशव केशरे याचा नरबळी दिला आहे.

आरवच दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल होतं. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

याबाबत सविस्तर वृत्त असे कि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव केशव केशरे या सात वर्षीय बालकाचा निर्घुण खून करण्यात आला. हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन दिवसांपासून आरव घरातून गायब होता. त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. ग्रामस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध केली.

त्याचबरोबर शाहूवाडी पोलिसांनी या शोधासाठी पथके पाठवली होती, मात्र आज सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे सापडला. त्याच्या अंगावर गुलाल, हळदी- कुंकू टाकण्यात आलं होतं.

Advertisement

यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पहाटे 6 वाजता आरवचा मृतदेह घराबाहेर सापडला. या घटनेमुळं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे

या प्रकरणाचा अधिक तपास शाहूवाडी पोलिस करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला काळींबा फासण्याचा हा प्रकार आहे. या चिमुकल्याचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Leave a comment