शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा भाजीपाला, कुक्‍कुटपालन, शेळीपालन, दूध असतो. परंतु एकीकडे दुधाचे बाजारभाव स्थिर असताना पशुखाद्य किरकोळ दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलो आहे.

त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मध्यंतरी कोरोनानंतर जनावरांचे बाजार चालू झाले होते. परंतु बाजारभावात जनावरांच्या किमती अधिक होत्या.

तरीदेखील कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दुभती जनावरे खरेदी केली होती. जनावरांसाठी पशुखाद्य चालू केत्यानंतर दुधाचे प्रमाण वाढते.

Advertisement

परंतु हेच पशुखाद्य दिवंसेदिवस महाग होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुखाद्यचे पैसे वजा करून खूप थोड्या प्रमाणात पैसे हातात मिळतात.

यामुळे शेतकरी कुटुंबाची आर्थिक कुचंबणा होते. खटाव तालुक्‍यात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. खाद्याचे दर वाढल्याने जनावरे कमी करण्याच्या मार्गावर शेतकरी आहेत.

एकीकडे दुधाच्या किमती स्थिर असताना, दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढत आहेत. दूध उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Advertisement

हा व्यवसाय न परवडल्याने शेतकऱ्यांना पशुधन कवडीमोल भावात विकावे लागते का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.