अहमदनगर : एकीकडे शिवसेना (Shivsena) भाजप (BJP) आरोपाचे सत्र राज्यात सुरु आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. भाजपचे नेते याला कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रश्मी ठाकरे (Rshmi Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन भाजप शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

संजय राऊत यांच्या (Sanjay Raut) पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात जाऊन राज्यातले राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

Advertisement

तसेच कोर्लई गावातील लोकांनी किरीट सोमय्या ग्रामपंचायत मधून बाहेर आल्यानंतर ग्रामपंचायतीचे गोमुत्राने शुद्धीकरण केले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, राजकारणातले प्रदूषण वाढले आहे, ते राजकारणातील हे प्रदूषण संपवणार असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच राजकारणाची पातळी घसरलीय.

दररोज काहीतरी सुरू असते, त्यामुळे ते थाबवण्याची गरज आहे. असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आज प्रदुषणमुक्त डिस्लरीचे उद्घाटन केले तसेच राजकारणातील प्रदुषण संपवणार, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर केली आहे.

Advertisement

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातले राजकीय वातावरण दूषित झाले असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आता भाजप यावर कशी प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.