कोरोना लसी च्या डोसचे उपलब्धतेचे प्रमाण वाढल्यानंतर आता लसीकरणाला गती आली आहे. केंद्र सरकारकडून लसींचा साठा मिळायला लागल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला आहे.

आतापर्यंत ग्रामीण भागातील 20 लाख 8 हजार 189 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी हीच संख्या एकूण 17 लाख 794 इतकी होती.

आठ दिवसांत सव्वा दोन लाख लोकांना लस

गेल्या आठ दिवसांत तब्बल दोन लाख 28 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या एकूण लसीकरणात 15 लाख 21 हजार 906 जणांनी पहिला, तर चार लाख 86 हजार 283 जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

Advertisement

‘कोविशिल्ड’ची टंचाई

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई आहे. आज फक्त 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळाला.

पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

4 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने लस देण्यात आली. ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज कोविशिल्ड लस दिली गेली नाही.

Advertisement

राज्यात सहा हजार रुग्ण

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. राज्यात सोमवारी 6,017 रुग्ण सापडले.

राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. राज्यात सोमवारी 13,051 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के एवढे झाले.

मुंबईची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

Advertisement

तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

 

Advertisement