नवी दिल्ली – आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2022) खास तयारी करण्यात आली आहे. तर, नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावर्षी पहिल्यांदाच स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली आहे.

तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जनतेला संबोधित देखील केलं असून, त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आहे.

दरम्यान, सध्या लाल किल्ल्यात आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

तसेच, स्वातंत्र्यासाठी अनेकांचे बलिदान, आज ऐतिहासिक दिवस, आजपासून नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचेच देखील त्यांनी सांगितलं.

ध्वजारोहण झाल्यानंतर लाल किल्ल्यावर तिरंग्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली असून, यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होत.

यावेळी मोदींनी देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला, क्रांतिवीरांनी ब्रिटिशांची झोप उडवली असं देखील सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच 21 तोफांच्या सलामीत स्वदेशी तोफांचा समावेश करण्यात आला आहे.

आतापर्यंत दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश पाउंडर गनमधून 21 तोफांची सलामी दिली जात होती. या वर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधानांना ‘अटॅग’ या स्वदेशी तोफेतून सलामी देण्यात आली आहे.