इंदूरच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहराची स्व्चछता करण्यात येणार आहे. त्यासाठी या महापालिकेच्या अधिकारी, नगरसेवकांनी इंदूरला जाऊन पाहणी केली. आता पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतेचा इंदूर पॅटर्न राबविला जाणार आहे.

तीन प्रभागात काम सुरू करणार

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूर शहर हे मागील चार वर्षापासून प्रथम क्रमांकाचे शहर ठरले असून पिंपरी चिंचवड शहराचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

तीन वॉर्डात स्वच्छतेचा ‘इंदूर पॅटर्न’ राबविला जाणार आहे, अशी माहिती महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

Advertisement

इंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकारी आणि अधिका-यांची बैठक झाली. आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

याविषयी माहिती देण्यासाठी महापालिकेत पत्रकार परिषद झाली. या वेळी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, स्थायी समिती सभासद शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे उपस्थित होते.

कच-याचं सहा प्रकारात वर्गीकरण

‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत इंदूर येथील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेस कचरा विलगीकरणाचे कामकाजासाठी प्रायोगिक तत्वावर ३ ते ५ वॉर्डमध्ये कामकाज करण्याकरिता नेमण्यात येणार आहे.

Advertisement

इंदूर शहरातील स्वच्छता कशा प्रकारे ठेवण्यात येते व शहरामध्ये असलेल्या स्वच्छतेच्या कारणाबाबत माहिती घेतली. कचरा विलगीकरण हे ३ ऐवजी ६ प्रकारे ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैव वैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक यानुसार वर्गीकरण करण्यात येते.

तसेच प्रत्येक घरामधून वरीलप्रमाणे सहा प्रकारामध्ये विलगीकरण असल्याशिवाय कचरा स्वीकारण्यात येत नाही. कचरा संकलनासाठी नियुक्त असलेल्या वाहनांचे मार्ग व वेळ कधीही बदलण्यात येत नाही, अशी माहिती ढाके यांनी दिली.

कसे चालते कामकाज ?

या कामकाजाकरिता प्रत्येक आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी, आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकडे वॉकी-टॉकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement

सर्व निवासी, व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरा विलगीकरण होत असल्याने व कचरा संकलनाचे वाहन वेळेत कचरा संकलन करत असल्याने कचराकुंडीची आवश्यकता भासत नाही, त्यामुळं संपूर्ण शहर कचराकुंडी विरहित आहे.

मंडईमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता बायोमिथिनेशन प्लेट कार्यान्वित केली आहे. त्याठिकाणी मंडईमधील सर्व कचरा टाकण्यात येतो. त्यावर प्रक्रिया करून सीएनजी गॅस तयार केला जातो.

कचरा संकलक वाहनांचे व्हीटीएस यंत्रणेद्वारे मॅपिंग व नियंत्रण केले जाते, ज्यामुळे कोणत्याही घराचा कचरा उचलण्यापासून राहत नाही.

Advertisement